Essentials meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Essentials meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘Essentials’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

Essentials’ चा उच्चार= इˈसेन्शल्स, एसेंशिअल्स

Essentials meaning in Marathi

‘Essentials’ म्हणजे अशा गोष्टी किंवा वस्तु ज्या परिस्थिती नुसार अत्यंत आवश्यक किंवा जरूरी असतात.

1. अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत आवश्यक.

2. मूलभूत घटक, गुणवत्ता किंवा एखाद्या गोष्टीचे वैशिष्ट्य.

3. एखाद्या गोष्टीचा मूलभूत किंवा सर्वात महत्वाचा भाग.

Essentials- मराठी अर्थ
अत्यावश्यक वस्तु
जीवनाच्या मूलभूत गरजा
बिलकुल जरूरी
आवश्यक तत्त्व
सार
तत्त्व

Essentials-Example

‘Essentials’ हा शब्द Noun (संज्ञा, नाम) या रुपात कार्य करतो. 

‘Essential’ शब्दाचा plural noun (अनेकवचनी नाम) ‘Essentials’ आहे.

‘Essentials’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: This book will give you the essentials of computer programming.
Marathi: हे पुस्तक तुम्हाला संगणक प्रोग्रामिंगचे आवश्यक ज्ञान देईल.

English: The salary is used mainly on essentials such as food and clothing.
Marathi: पगाराचा वापर प्रामुख्याने अन्न आणि वस्त्र यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर केला जातो.

English: He keeps all his valuable essentials in the bank locker.
Marathi: तो त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो.

English: He lost all his essentials in the fire.
Marathi: आगीत त्यांचे सर्व जीवनावश्यक सामान जळून खाक झाले.

English: Food, clothes, and a house are essentials of life.
Marathi: अन्न, वस्त्र, घर या जीवनावश्यक गोष्टी आहेत.

English: The essentials for everyday life.
Marathi: दैनंदिन जीवनासाठी आवश्यक गोष्टी.

English: They only have time to pack the essentials.
Marathi: त्यांच्याकडे फक्त आवश्यक वस्तू पॅक करण्यासाठी वेळ आहे.

English: Teachers discussed the essentials of English grammar with the students.
Marathi: शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजी व्याकरणाच्या आवश्यक गोष्टींवर चर्चा केली.

English: Police had doubted the essentials of the thief’s story.
Marathi: चोराच्या कथेतील महत्त्वाच्या मुद्यांवर पोलिसांना शंका होती.

English: The government provided the essentials to the citizens during the war period.
Marathi: युद्धकाळात सरकारने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या.

‘Essentials’ चे इतर अर्थ

bare essentials= अगदी आवश्यक गोष्टी

life’s essentials= जीवनातील आवश्यक गोष्टी

daily essentials= दैनंदिन आवश्यक गोष्टी

beauty essentials= महिलांना सुंदर बनवणारी उत्पादने

basic essentials= मूलभूत आवश्यक गोष्टी

essentials for the home= घरासाठी आवश्यक वस्तू

essentials of the new system= नवीन प्रणालीच्या आवश्यक गोष्टी

‘Essentials’ Synonyms-antonyms

‘Essentials’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

elements
foundation
basics
nitty-gritty
rudiments
fundamentals
principles

‘Essentials’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

details
trivia

 

Leave a Comment