Heist meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Heist meaning in Marathiया लेखात इंग्रजी शब्द ‘Heist’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Heist’ चा उच्चार= हाइस्ट

Heist meaning in Marathi

1. ‘Heist’ म्हणजे बँक, दुकान किंवा विशिष्ट ठिकाणाहून अत्यंत मौल्यवान वस्तू किंवा पैसे लुटण्याची किंवा चोरी करण्याची क्रिया.

2. बँक, दुकान किंवा विशिष्ट ठिकाणाहून पैसे किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू चोरणे किंवा त्यावर दरोडा टाकणे.

साधारणपणे ‘Heist’ म्हणजे मोठा दरोडा.

Heist- मराठी अर्थ
Noun (संज्ञा, नाम)
दरोडा
डाका
लूट
चोरी
verb (क्रिया)
दरोडा घालणे
लूटमार करणे 
लुटणे
चोरी करणे

Heist-Example

‘Heist’ हे noun (संज्ञा, नाम) आणि verb (क्रिया) या दोन्ही रूपात कार्य करते. 

‘Heist’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: Robbers planned to heist the precious diamonds from the famous jewelry shop.
Marathi: दागिन्यांच्या प्रसिद्ध दुकानातून मौल्यवान हिरे लुटण्याची योजना दरोडेखोरांनी आखली होती.

English: As an accused of a bank heist, he got seven years in prison.
Marathi: बँक चोरीचा आरोपी म्हणून त्याला सात वर्षांची शिक्षा झाली.

English: He went on a heist in a jewelry shop and got away with gold ornaments.
Marathi: तो एका दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्यासाठी गेला आणि सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला.

English: They have heisted seven crores from the bank.
Marathi: त्यांनी बँकेतून सात कोटींची लूट केली आहे.

English: They heisted hundreds of iPhones from the Apple store.
Marathi: त्यांनी एप्पल स्टोअरमधून शेकडो आयफोन चोरले.

English: They had all plans to heist the shop hastily.
Marathi: घाईघाईने दुकान लुटण्याचा त्यांचा सगळा बेत होता.

English: They heisted lots of money from the shop at gunpoint.
Marathi: त्यांनी बंदुकीच्या धाकाने दुकानातून मोठी रक्कम लुटली.

English: Police went to the place where the heist crime has happened.
Marathi: ज्या ठिकाणी चोरीचा गुन्हा घडला आहे त्या ठिकाणी पोलीस गेले.

English: Civilians criticized police for failure to stop heist crimes in cities.
Marathi: शहरातील चोरीचे गुन्हे रोखण्यात पोलिस अपयशी ठरल्याची टीका नागरिकांनी केली.

English: The world’s most famous British heist was the 1963 train robbery.
Marathi: जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रिटीश दरोडा हा 1963 चा रेल्वे दरोडा होता.

‘Heist’ चे इतर अर्थ

money heist- पैशांची चोरी

jewelry heist- आभूषण चोरी, दागिने लुटणे

heist report- चोरीचा अहवाल

bank heist- बँक चोरी

time heist- वेळ चोरी

rogue heist- दुष्ट दरोडा, बदमाश चोरी

heister- चोरी

heist name- दरोड्याचे नाव, चोरीचे नाव

heist out- चोरी करणे

hurricane heist- चक्रीवादळ चोरी

heart heist- हृदय चोरी

bride heist- वधू चोरी

‘Heist’ Synonyms-antonyms

‘Heist’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

robbery
theft
burgle
burglary
steal
holdup
larceny
pilferage
rip-off
break-in

‘Heist’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

purchase
buy
donate
hand over
bestow
contribute
give

 

2 thoughts on “Heist meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary”

 1. Nice effort . Thank you. But would like to suggest that please post correct translations in Marathi.
  Example English: Robbers planned to heist the precious diamonds from the famous jewelry shop.
  Marathi: प्रसिद्ध दागिन्यांच्या दुकानातून मौल्यवान हिरे लुटण्याची योजना दरोडेखोरांनी आखली होती.
  Here correct Marathi sentence is दागिन्यांच्या प्रसिद्ध दुकानातून मौल्यवान हिरे लुटण्याची योजना दरोडेखोरांनी आखली होती.
  Also some more corrections घाईघाईने दुकान लुटण्याचा त्यांचा सगळा बेत होता.

  Reply
  • Thanks for your valuable suggestion, Madam. Next time we will try to be more precise. We did the correction as you suggest. Your opinion matter to us. It helps to improve the content of the website

   Reply

Leave a Comment