Remuneration meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Remuneration meaning in Marathiया लेखात इंग्रजी शब्द ‘Remuneration’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदहारणा सहित समजावून सांगितला गेला आहे. त्याच बरोबर याचे समानार्थी (Synonym) आणी विरुद्धार्थी शब्द (Antonym) सुद्धा दीले गेले आहेत.

‘Remuneration’ चा उच्चार= रिम्यूनरेशन, रिमयूनˈरेशन

Remuneration meaning in Marathi

1. ‘Remuneration’ म्हणजे कोणत्याही केलेल्या कामासाठी मिळणारा मोबदला, मानधन किंवा वेतन.

2. केलेल्या कामाच्या मोबदल्यात एखाद्याला दिले गेलेले पैसे.

Remuneration- मराठी अर्थ
मोबदला
मानधन
वेतन
मेहनताना

Remuneration-Example

‘Remuneration’ शब्द एक noun (संज्ञा, नाम) आहे.

‘Remuneration’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: He is unhappy with his nominal remuneration.
Marathi: तो त्याच्या नाममात्र मोबदल्यावर नाखूश आहे.

English: The company declared equal remuneration for men as well as women.
Marathi: कंपनीने पुरुषांबरोबरच महिलांनाही समान मोबदला देण्याची घोषणा केली.

English: The government announced a revised remuneration policy for unskilled labor.
Marathi: सरकारने अकुशल कामगारांसाठी सुधारित मोबदला धोरण जाहीर केले.

English: Farmers expected adequate remuneration for the land acquired by the government.
Marathi: सरकारने संपादित केलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला अपेक्षित होता.

English: Remuneration consists of bonuses, incentives, allowances, etc. in addition to the basic salary of the employee.
Marathi: कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराव्यतिरिक्त मोबदल्यात बोनस, प्रोत्साहन, भत्ते इत्यादींचा समावेश असतो.

English: salary is the one type of remuneration.
Marathi: पगार हा एक प्रकारचा मोबदला आहे.

English: The employees should be paid fair remuneration.
Marathi: कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे.

English: Remuneration is compensation which a person gets against the services they are rendering in the organization.
Marathi: मोबदला म्हणजे एखाद्या व्यक्तीला संस्थेत देत असलेल्या सेवांच्या बदल्यात मिळणारी भरपाई.

English: He is not ready to accept a post with minimal remuneration.
Marathi: तो कमी मोबदल्यासह कोणतेही पद स्वीकारण्यास तयार नाही.

English: After earning a huge profit, the company increased the remuneration of its employees.
Marathi: प्रचंड नफा कमावल्यानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले.

‘Remuneration’ चे इतर अर्थ

consolidated remuneration- एकत्रित मोबदला

managerial remuneration- व्यवस्थापकीय मोबदला

equal remuneration- समान मोबदला

gross remuneration- एकूण मोबदला

legal remuneration- कायदेशीर मोबदला

remuneration policy- मोबदला धोरण, भरपाई धोरण

remuneration approach- मोबदला दृष्टीकोन

lieu of remuneration- मोबदल्याच्या बदल्यात, मोबदल्याऐवजी

a post without remuneration- मोबदल्याशिवायचे एक पद

fair remuneration- योग्य मोबदला, उचित मेहनताना

financial remuneration- आर्थिक मोबदला

non-remuneration- विना मोबदला

nominal remuneration- नाममात्र मोबदला

remuneration job- मोबदला नोकरी

remuneration work- मोबदला काम

remuneration price- मोबदला किंमत

remuneration year- मोबदला वर्ष

remunerative- मोबदला, फिफायतशीर

remunerate- मोबदला, मेहनताना देणे (कामाचा मोबदला देणे)

‘Remuneration’ Synonyms-antonyms

‘Remuneration’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

payment
wages
salary
stipend
honorarium
earnings
reward
recompense
reimbursement
remittance

‘Remuneration’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

nonpayment
pay cash
charge

 

Leave a Comment