Sometimes you don’t get what…| सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

Sometimes you don’t get what you want because you deserve better meaning in Marathi: या लेखात या इंग्रजी वाक्याचा (sentence) अर्थ सोप्या मराठी मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे.

या इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार (pronunciation)= सम टाइम्स यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट बिकॉज़ यू डीजर्व बेटर

English: Sometimes you don’t get what you want because you deserve better.
Marathi: काहीवेळा तुम्हाला जे हवे आहे ते मिळत नाही, कारण तुम्ही अधिक चांगल्यासाठी पात्र असता. 

इतर उदाहरणे (Other Examples)

English: I don’t know what I did to deserve a best friend like you.
Marathi: मला माहित नाही, तुझ्यासारखा चांगला मित्र मिळण्याच्या पात्रतेचा होण्यासाठी मी काय केले होते.

English: I don’t know what I did to deserve you.
Marathi: तुझ्या लायक होण्यासाठी मी काय केले होते ते मला माहित नाही.

English: I think you deserve better than me.
Marathi: मला वाटते की तुम्ही माझ्यापेक्षाही अधिक चांगले मिळण्यासाठी पात्र आहात.

English: Sometimes you don’t get what you want.
Marathi: 1) कधी कधी आपल्याला पाहिजे ते मिळत नाही. 2) कधी कधी तुम्हाला हवं ते मिळत नाही.

English: Sometimes the person you want doesn’t deserve you.
Marathi: कधीकधी तुम्हाला हवी असलेली व्यक्ती तुमच्या लायक नसते.

English: Sometimes life doesn’t give you what you want not because you don’t deserve it.
Marathi: कधी कधी जीवन तुम्हाला हवं ते देत नाही, कारण तुम्ही त्यासाठी पात्र नसता म्हणून.

English: Karma has no menu you get what you deserve.
Marathi: कर्मा साठी कोणतीही यादी नाही, तुम्ही ज्या साठी पात्र आहात ते तुम्हाला मिळते.

English: I don’t think I deserve you.
Marathi: 1) मला वाटत नाही, मी तुझ्या लायक आहे. 2) मला वाटत नाही की मी तुझ्या साठी योग्य आहे.

English: Sometimes you have to forget what you feel and remember what you deserve.
Marathi: कधीकधी आपल्याला काय वाटते ते विसरून जावे लागते आणि लक्षात ठेवावे लागते की आपण कशासाठी लायक (पात्र) आहोत.

English: You get served what you deserve.
Marathi: 1) तुम्हाला तेच मिळते, ज्यासाठी तुम्ही लायक असता. 2) तुम्ही ज्या साठी पात्र असता तेच तुम्हाला मिळते.

English: You hurt me more than what I deserve.
Marathi: माझ्या लायकीपेक्षा जास्त तू मला दुखावलंस.

English: You don’t deserve it.
Marathi: 1) तुम्ही त्यास पात्र नाही. 2) तू त्या लायक नाहीस.

Sometimes you don’t get what you want because you deserve better meaning in Marathi

Leave a Comment