What meaning in Marathi | सोपा अर्थ मराठीत | Indian Dictionary

What meaning in Marathi: या लेखात इंग्रजी शब्द ‘What’ चा अर्थ सोप्या मराठी भाषे मधे उदाहरणा सहित समजावून सांगितला गेला आहे.

‘What’ चा उच्चार= व्हाट, वॉट

What meaning in Marathi

‘What’ हा शब्द प्रामुख्याने प्रश्नार्थक (questions), उद्गारवाचक (exclamation) आणि एखाद्या व्यक्तीकडून माहिती मिळवण्यासाठीच्या वाक्यांमध्ये वापरला जातो.

What- मराठी अर्थ
काय
कशा प्रकारे
कोणते
कोणत्या बाबतीत
किती प्रमाणात
कोणती घटना किंवा वस्तू 

‘What’ हा शब्द निम्नलिखित परिस्थितीत वापरला जातो.

1. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा विशिष्ट गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यासाठी. उदाहरणार्थ:-

English: What is your age?
Marathi: तुमचे वय काय आहे?

English: What was your last salary?
Marathi: तुमचा शेवटचा पगार किती होता?

2. ‘What’ हा शब्द उद्गारवाचक (exclamations) वाक्यांमध्ये वापरला जातो. | उदाहरणार्थ:-

English: What! He divorced his wife?
Marathi: काय! त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला?

English: What! You saw murderer?
Marathi: काय! तुम्ही खुनी पाहिला?

3. जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा ऐकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपण त्या व्यक्तीला ती गोष्ट पुन्हा सांगण्यास सांगतो, अशावेळी ‘What’ हा शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ:-

English: What? I didn’t understand, please repeat it.
Marathi: काय? मला समजले नाही, कृपया ते पुन्हा करा.

English: What? I can’t hear you.
Marathi: काय? मी तुम्हाला ऐकू शकत नाही.

What-Example

‘What’ हा शब्द pronoun (सर्वनाम), determiner (निर्धारक) आणि adverb (क्रियाविशेषण) या दोन्ही रूपात कार्य करतो.

‘What’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:

English: What is your name?
Marathi: तुझं नाव काय आहे?

English: What is today?
Marathi: आज काय आहे?

English: What luck!
Marathi: काय नशीब!

English: What is your father?
Marathi: तुझे वडील काय आहेत?

English: What’s up, dude?
Marathi: काय राव! कसे आहात?

English: What’s up my brother?
Marathi: काय चालले आहे माझ्या भावा?

English: What’s up with you today?
Marathi: आज तुझे काय चालले आहे?

English: What’s up, man?
Marathi: काय चालू आहे मित्रा?

English: What happened to your husband?
Marathi: तुझ्या नवऱ्याला काय झालं?

English: What happened, dear friend?
Marathi: काय झालं प्रिय मित्रा?

English: What happened, my love?
Marathi: काय झाले माझ्या प्रिये?

English: For what purpose are you interested in it?
Marathi: तुम्हाला त्यात कोणत्या हेतूने स्वारस्य आहे?

English: What else do you like?
Marathi: अजून तुला काय आवडतं?

English: What else do you want?
Marathi: अजून काय हवंय?

English: What else do you have?
Marathi: तुझ्याकडे अजून काय आहे?

English: What else do you have to do?
Marathi: तुला अजून काय करायचं आहे?

English: What else do you need to know?
Marathi: आपल्याला आणखी काय माहित असणे आवश्यक आहे?

English: What else do you want from me?
Marathi: तुला माझ्याकडून अजून काय हवंय?

English: Regarding what I want to tell you.
Marathi: मला तुम्हाला काय सांगायचे आहे त्याबद्दल.

English: What kind of work do you do?
Marathi: तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता?

English: What kind of work are you doing?
Marathi: तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करत आहात?

English: What kind of job do you do?
Marathi: तुम्ही कोणत्या प्रकारची नोकरी करता?

English: What time is it?
Marathi: किती वाजले?

What meaning in Marathi

English: What did you wear yesterday?
Marathi: काल तुम्ही काय परिधान केले होते?

English: What size shirt do you take?
Marathi: तुम्ही कोणत्या मापाचा शर्ट घेता?

English: What’s the matter with you, bro?
Marathi: तुला काय झालंय भाऊ?

English: What did you say to him?
Marathi: तू त्याला काय म्हणालास?

English: What caused the accident?
Marathi: अपघात कशामुळे झाला?

English: What do you want?
Marathi: तुम्हाला काय हवे आहे?

English: What do you want from me now?
Marathi: आता तुला माझ्याकडून काय हवे आहे?

English: What kind of movies does she like?
Marathi: तिला कोणत्या प्रकारचे चित्रपट आवडतात?

English: Then what happened?
Marathi: मग काय झालं?

English: Then what happened to you?
Marathi: मग तुला काय झालं?

English: Then what should I do?
Marathi: मग मी काय करू?

English: Then what to do?
Marathi: मग काय करायचं?

English: Then what do you do?
Marathi: मग तुम्ही काय करता?

English: Then what do I do?
Marathi: मग मी काय करू?

English: Do what you love.
Marathi: तुला जे आवडते ते कर.

English: Do what you want.
Marathi: तुला जे करायचंय ते कर.

English: Do what makes you happy.
Marathi: जे तुम्हाला आनंद देते ते करा.

English: But what happens next?
Marathi: पण पुढे काय होणार?

English: But what happened to you?
Marathi: पण तुला काय झालं?

English: But what about you?
Marathi: पण तुझं काय?

English: So what are you doing now?
Marathi: तर तू आता काय करतो?

English: So what do you do?
Marathi: मग तुम्ही काय करता?

English: So what are you doing?
Marathi: मग तुम्ही काय करत आहात?

English: Thanks for what you did.
Marathi: तुम्ही जे केले त्याबद्दल धन्यवाद.

English: Sorry for what happened.
Marathi: जे झाले त्याबद्दल क्षमस्व.

English: Sorry for what I said.
Marathi: मी जे बोललो त्याबद्दल क्षमस्व.

English: Sorry for what I did.
Marathi: मी जे केले त्याबद्दल क्षमस्व.

English: I didn’t know what else to say.
Marathi: अजून काय बोलावे तेच कळत नव्हते.

What meaning in Marathi

English: So what if he doesn’t like it.
Marathi: मग त्याला ते आवडत नसेल तर काय.

English: What does he care?
Marathi: त्याला काय काळजी आहे?

English: What is this?
Marathi: हे काय आहे?

English: What is a containment zone?
Marathi: प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे काय?

English: What is he?
Marathi: तो काय आहे?

English: What is a landmark?
Marathi: महत्त्वाची खूण म्हणजे काय?

English: What is a soulmate?
Marathi: सोबती म्हणजे काय?

English: What is nepotism?
Marathi: घराणेशाही म्हणजे काय?

English: What is your occupation?
Marathi: तुम्ही काय काम करतात?

English: What is your profession?
Marathi: आपला व्यवसाय काय आहे?

English: What is your designation?
Marathi: तुमचे पद काय आहे?

English: What is your qualification?
Marathi: तुमची पात्रता काय आहे?

English: What is your problem?
Marathi: तुझी समस्या काय आहे?

English: What is your nationality?
Marathi: तुमचे राष्ट्रीयत्व काय आहे?

English: What is your wish?
Marathi: तुमची इच्छा काय आहे?

English: What is the hell?
Marathi: काय हा मूर्ख पणा?

English: What is the issue?
Marathi: मुद्दा काय आहे?

English: What is the status?
Marathi: स्थिती काय आहे?

English: What are these?
Marathi: हे काय आहे?

English: What are these things?
Marathi: या गोष्टी काय आहेत?

English: What the hell happened here?
Marathi: इथे काय झालं?

English: What the hell is going on?
Marathi: हे काय चालले आहे?

English: What the hell are you doing?
Marathi: हे काय करत आहेस?

English: What the hell are you?
Marathi: तू काय बकवास करत आहेस?

English: What is this behavior?
Marathi: हे वर्तन काय आहे?

What meaning in Marathi

English: What is bitcoin?
Marathi: बिटकॉइन म्हणजे काय?

English: What are you doing?
Marathi: आपण काय करत आहात?

English: What are your strengths and weaknesses?
Marathi: तुमची ताकद आणि कमकुवतता काय आहेत?

English: What are the parts of the plant?
Marathi: वनस्पतीचे भाग कोणते आहेत?

English: What is cryptocurrency?
Marathi: क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

English: What are rational numbers?
Marathi: परिमेय संख्या काय आहेत?

English: What are prime numbers?
Marathi: मूळ संख्या काय आहेत?

English: What are the various uses of soil?
Marathi: मातीचे विविध उपयोग काय आहेत?

English: What are the characteristics of the Indian economy?
Marathi: भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती?

English: What are the uses of cotton?
Marathi: कापसाचे काय उपयोग?

English: What will happen next?
Marathi: पुढे काय होणार?

English: What will absorb heat?
Marathi: उष्णता काय शोषेल?

English: What will be the output of the program?
Marathi: प्रोग्रामचे आउटपुट काय असेल?

English: What happens when you die?
Marathi: तुमचा मृत्यू झाल्यावर काय होते?

English: What happens to a person suffering from covid-19?
Marathi: कोविड-19 ग्रस्त व्यक्तीचे काय होते?

English: What happens when liver damage?
Marathi: यकृत खराब झाल्यास काय होते?

English: What’s that smell?
Marathi: तो वास कशाचा आहे?

English: What’s that sound like?
Marathi: तो आवाज कसा आहे?

English: Be happy with what you have.
Marathi: आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी रहा.

‘What’ चे इतर अर्थ

then what- मग काय

do what- काय करू

but what- पण काय

But what happened?- पण काय झालं?

so what- तर काय

whats up- काय चालू आहे

what happened- काय झालं

what happened to you?- तुला काय झाले?

what happened to her?- तीला काय झालं?

for what- कशासाठी

what for- कशासाठी

for what reason?- कोणत्या कारणासाठी?

thanks for what?- धन्यवाद कशासाठी?

sorry for what?- क्षमा कशाबद्दल?

miss what?- काय चुकले?

for what purpose?- कोणत्या उद्देशाने?

what else- आणखी काय

regarding what?- कशाबद्दल?

what kind- कोणत्या प्रकारच्या

what kind of job?- कोणत्या प्रकारची नोकरी?

what kind of work?- कोणत्या प्रकारचे काम?

‘What’ Synonyms

‘What’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

which
of what sort
that
if
if only
how
as
till
whatever
whatsoever

🎁 What is this शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

🎁 Have शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

🎁 Is शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

🎁 This शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

🎁 You शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

🎁 For शब्दाचा सोपा अर्थ मराठीत

What meaning in Marathi

Leave a Comment